अखिल भारतीय मराठा महासंघ खामगावच्या वतीने शहीद दिनानिमित्त सामान्य रूग्णालयात अन्नदान

खामगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे क्रांतिकारक भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त व अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यानंतर येथील सामान्य रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले.

 

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम शिवाजी नगर येथे अखिल भारतीय मराठा महासंघ खामगाव जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता मॉ साहेब जिजाऊंच्या पुतळ्याचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटीश सत्तेविरोधात भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांनी लढा देत देशसेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. हसत – हसत फासावर चढत देशासाठी आपल्या देहाचा त्याग केला. त्या भगतसिंह, सुखदेव व राजगुरू या महान क्रांतीकारकांना शहीद दिनानिमित्त व अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माथाडी कामगारांचे नेते, मराठा आरक्षणाकरिता आपल्या प्राणाची बलिदान देणारे मराठा समाजाचा स्वाभिमान अभिमान स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यानंतर येथील सामान्य रुग्णालयामध्ये शिवनेरी ग्रुपच्या वतीने राबविण्यात येणारी शिवनेरी लंगर सेवेमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज सकाळी साडेअकरा वाजता रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले. यावेळी राजमाता मॉ साहेब जिजाऊं, छत्रपती शिवरायांच्या वीर जवान शहिदांच्या तसेच स्वर्गीय अण्णासाहेबांच्या जय घोषाच्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ तसेच आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Protected Content