अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या तिघांना शिक्षा

Landmark Supreme Court Judgment Mary Roy v. The State of Kerala 1

जळगाव प्रतिनिधी । अवैधरित्या वाळूची डंपरने वाहतूक केल्याप्रकरणी शहर पोलीसात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तीन आरोपींना प्रत्येकी तीन महिन्याची शिक्षा आज जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली असून या शिक्षेमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या तीन आरोपीतील दोघांना यापुर्वी अवैध वाळू वाहतूक आणि अंगावर डंपर नेल्याप्रकरणी नोव्हेबर 2019 मध्ये पाच वर्षाची सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील जिल्हा परिषेदेसमोर 12 डिसेंबर 2012 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास डंपर क्रमांक (एमएच 32 बी 9681) ने अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असतांना शहर पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी श्यामकांत लाळ यांनी डंपर थांबवित कारवाई केली होती. याप्रकरणी तिघांविरोधात शहर पोलीसात पोलीस कर्मचारी श्यामकांत लाळ यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक सत्यभान भागवत रंधे (29, रा. खेडी), हर्षल प्रकाश सोनवणे रा. जळगाव आणि डंपर मालक कृष्णा भागवत कोळी (वय-41, रा. पंचमुखी हमुनमान मंदिरामागे, जळगाव) यांच्या विरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी बापू सोनवणे यांनी दोषारोपत्र दाखल केले होता. यात प्रकरणात एकूण 5 साक्षिदार तपासण्यात आले होते. चालकास व डंपरमालकास आज बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.वाय. नेमाडे यांनी यांनी तिघांना दोषी ठरवत तिघांना प्रत्येकी 3 महिने शिक्षा आणि 5 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास 1 वर्षाची साधी कैद सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. रंजना पाटील यांनी काम पाहिले.

यातील दोन आरोपींना अवैध वाळू वाहतूक आणि अंगावर डंपर नेल्याप्रकरणी 3 नोव्हेबर 2018 रोजी देखील डंपरचालक सत्यभान भागवत रंधे (वय २९, रा. खेडी) याला ५ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड तसेच पुरावे नष्ट करण्याच्या कलमाखाली १ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर डंपरमालक कृष्णा भागवत कोळी (वय ४१, रा. पंचमुखी हमुनमान मंदिरामागे, जळगाव) यास वाळूचोरी प्रकरणी २ वर्षे सक्तमजुरी व पुरावे नष्ट करण्याच्या कलमाखाली १ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती.

Protected Content