कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांना ५० हजार रूपयांची तातडीने मदत करा- जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांना आणि परिवारातील नातेवाईकांना ५० हजाराची तातडीने मदत करावी, अशी मागणीचे निवेदन लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.

 

लोकसंघर्ष मोर्चाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांना व परिवारातील स्री अथवा पुरुष गमावलेल्या व्यक्तींना 50 हजार रुपये देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले असताना जळगाव जिल्ह्यात मात्र लाभ देण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने कोरोना एकल महिलांना निराधार पेन्शन, बालक पालक योजना, हक्काचे रेशन,उद्योग सुरू करायला अर्थार्जन, मनरेगा अंतर्गत ग्रामीण भागात रोजगार, बचत गटाच्या माध्यमातून लाभ असे असताना तालुका स्तरीय वात्सल्य समितींच्या माध्यमातून काम पुढे सरकत नाही. त्यामुळे कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांना आणि परिवारातील नातेवाईकांना ५० हजाराची तातडीने मदत करावी अशी मागणीचे निवेदन गुरूवारी २० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर भरत कर्डीले, रत्ना महाजन, जयश्री कहाणे, लता कापडणे, एस.बी. सोनवणे, आरती सकट, सविता पाटील यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content