चाळीसगाव तालुक्यात ” आमदार आपल्या दारी’ योजनेला प्रारंभ!

चाळीसगाव, प्रतिनिधी | आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून ” आमदार आपल्या दारी’ योजनेला तालुक्यातील गोरखपूर तांडा येथे बुधवारी पासून प्रारंभ झाली आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हि योजना राबविण्यात येत आहेत

 

तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी खेड्यापाड्यातून त्यांना चाळीसगाव शहरात यावे लागते. त्यात काही वेळा योजनेची माहितीच त्यांना संबंधित विभागाकडून मिळत नाही. त्यामुळे अनेक दिवस फेरफटका मारूनही नागरिकांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. हि गंभीर स्वरूपाची बाब लक्षात येताच आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून ” आमदार आपल्या दारी’ शासकीय योजना पोहोचतील घरोघरी योजनेला तालुक्यातील गोरखपूर तांडा येथून बुधवार, ८ डिसेंबर रोजी पासून सुरूवात झाली आहे. भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हि योजना राबविण्यात येत आहेत.

या योजनेअंतर्गत १) नवीन रेशनकार्ड नोंदणी करणे, २) हरवलेले अथवा फाटलेले रेशनकार्ड परत बनवून देणे, (३) रेशनकार्ड मध्ये नवीन नाव वाढवणे, ४) श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, (५) संजय गांधी निराधार योजना (विधवा, दिव्यांग, परित्यक्त्या आदी १८ ते ६४ वयोगटासाठी), ६) राष्ट्रीय वयोश्री योजना ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी २० प्रकारची मोफत सहाय्यक उपकरणे, ७) गोपीनाथरावजी मुंडे शेतकरी अपघात विमा (शेतकरी कुटुंबातील व्यक्तींना २ लाखांचे विमा संरक्षण), ८) मोफत ई-श्रमिक कार्ड असंघटीत कामगारांची नोंदणी व २ लाखांचे विमा संरक्षण, ९) आधार कार्ड नावात बदल, नाव व पत्त्यात दुरुस्तीसाठी आमदारांचा दाखला, १०) कोरोनाने निधन झालेल्या मयतांच्या वारसांना ५० हजार सानुग्रह अनुदान आदी सेवा निःशुल्कने मिळवून दिली जाणार आहे. या योजनेला पहिल्याच दिवशी गोरखपूर तांडा येथे नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय दुर झाल्याने अभुतपुर्व अशी संकल्पना यशस्वी ठरल्याचे चित्र यावेळी दिसून आले. याबाबत सर्व स्तरातून आ. मंगेश चव्हाण यांचे कौतुक होत आहे.

Protected Content