चाळीसगावात डॉक्टरांच्या घरी डल्ला; दोन लाखांची रोकड लांबविली

चाळीसगाव प्रतिनिधी ।  शहरातील कॅप्टन कॉर्नर येथे राहणाऱ्या एका खासगी डॉक्टराच्या घरातील लोखंडी कपाटातून अज्ञात इसमाने २ लाख ६ हजार रुपये रोखड लंपास केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, विवेक बळवंतराव बोरसे (वय-४०) रा. कॅप्टन कॉर्नर चाळीसगाव हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास असून शहरातील चिरायू दवाखान्यात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान बोरसे हे नेहमीप्रमाणे ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वा. घराला कुलूप लावून दवाखान्यात निघून गेले. दवाखान्यातील काम आटोपल्यानंतर ते सायंकाळी ४:३० वाजता घरी परतले. घरातील सर्व जण मुंबई येथे गेलेले असल्याने त्यांना झोप लागली. सायंकाळी ७ वाजता बोरसे झोपेतून उठल्यावर त्यांना लोखंडी कपाटाला चावी लावलेली असल्याचे दिसून आली. त्यावर त्यांनी कपाटात पाहणी केली असता त्या कपाटात ठेवलेले ५ लाखांऐवजी २ लाख ६ हजार रुपये हे दिसून आले नाही. घरात शोधाशोध केल्यावर पैसे मिळून आले नाही. म्हणून कोणीतरी अज्ञात इसमाने पैसे चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्याने चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम- ३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि डिकले हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!