मुदतीअखेर ५४ जणाची माघार

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यातील ग.स.सोसायटीच्या निवडणुक माघारी मुदतीअखेर ५४ जणांनी माघार घेतली आहे. तर उर्वरित ११६
उमेदवारांची आता प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सोसायटीची सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २५ मार्च ते ३१ मार्च मुदतीअखेर २७८ इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यात १७० उमेदवारी अर्ज वैध होते. यातील वैध अर्जांपैकी १३ एप्रिल पर्यंत १४ तर १८ रोजी अर्ज माघारीच्या मुदतीअखेर एकूण ५४ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

माघारीनंतर २८ एप्रिल रोजी मतदान तर ३० एप्रिल रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजीच्या माघारीनंतर निवडणूक रिंगणात ११६ उमेदवार असून यात माजी व विद्यमान संचालक, अध्यक्षांसह अन्य उमेदवारांचा यात समावेश आहे.

६ गटातून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
ग.स. सोसायटी निवडणुकीत स्थानिक, बाहेरील, अनु.जाती/जमाती, महिला राखीव, इतर मागासवर्ग, भटक्या जाती, विमुक्त जमाती, वि.मा.प्र या ६ गटातून महीला राखीव २८, इमाव १८,  अनुसूचित जाती/ जमाती १२,  स्थानिक ५४
, बाहेरील १४१, भटक्या विमुक्त २५ असे २७८ इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात छाननीनंतर १७० अर्ज वैध होते. यातून ५४ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात स्थानिक २७, बाहेरील ५६, अनु.जाती/जमाती ६, महिला राखीव १२, इतर मागासवर्ग ६, भटक्या जाती ९ या ६ गटातून ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातून २१ संचालक उमेदवार निवडून देण्यात येणार आहे.

ग.स.सोसायटीच्या या निवडणुकीसाठी सहकार, लोकसहकार, लोकमान्य, प्रगती, स्वराज्य पॅनल असे पाच पॅनल रिंगणात उतरले आहे. सर्व गटांच्या उमेदवारा कडून निवडणूक प्रचार सभा यापूर्वीच सुरु झाल्या असून यात सुनिल निंबा पाटील, विलास नेरकर, गणेश पाटील, प्रतिभा सुर्वे, मगन पाटील, सुनिल अमृत पाटील, शैलेश राणे यांच्याह अन्य उमेदवाराकडून आपापल्या पॅनलतर्फे तालुका तसेच ग्रामीण भागातील सभासद संचालक यांच्या भेटी घेत आहेत.

Protected Content