पुनाळेकर व भावे यांच्या सुटकेसाठी यावल येथे निवेदन

yawal nivedan

यावल प्रतिनिधी । डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा संशयित म्हणून संजीव पुनाळेकर आणि आरटीआय कार्यकर्ता विक्रम भावे यांना बेकायदेशीर सीबीआयने अटक केल्याचा निषेध यावलमध्ये करण्यात आला. याबाबत तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना सीबीआयने दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी 25 मे रोजी अटक केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सध्या सीबीआय यंत्रणा करत असून गेल्या तीन वर्षात सीबीआयने निरपराध हिंदूंना संशयितरित्या अटक केली आहे. आता या प्रकरणी 10 महिन्यांपुर्वी एका अशाच संशयित आरोपीच्या जबाबावरून या दोघांना अटक केली असल्याने सीबीआयने केलेली ही कारवाई अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह आहे. या सर्व प्रकारात सीबीआयचे वागणे हे संशयास्पद आणि हिंदुत्ववाद्यांवर दबावतंत्र निर्माण करणारे असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.

या आहेत मागण्या
या संपुर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच या प्रकरणातील सीबीआयच्या भूमिकेचाही तपास करण्यात यावा. सीबीआयने अधिकारी नंदकमार नायर यांच्याकडून डॉ. दाभोलकर प्रकरणाचा तपास काढून तो अन्य निष्पक्ष अधिकाऱ्याकडे सोपविण्यात यावा अन्यथा तो तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावा. अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची मीडिया ट्रायल द्वारे होत असलेली मानहानी आणि हिंदुत्वनिष्ठांचे दमन थांबवावे. ‘सीबीआय’चा कलंकित पूर्वेतिहास पहाता हिंदुत्वानिष्ठ कार्यकर्त्यांना षडयंत्रापूर्वक अडकवल्याची उदाहरणे आहेत. याप्रसंगी अशी शक्यता नाकारता येत नाही. तरी वरील सर्व गोष्टी पहाता निष्पाप असलेले अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना त्वरीत मुक्त करावे अशी मागणी यावेळी पत्रकात केली आहे. निवेदनावर हिन्दू जनजागृती समितीचे सामितीकरता प्रशांत जुवेकर, राहुल कोळी,रिषीकेश नेवे, गोकल कोळी, प्रेमकोलते, राहुल चौधरी, विनोद पाटील, अजय नेवे आदींच्या स्वाक्षरी आहे.

Add Comment

Protected Content