Home Cities यावल हरीभाऊ जावळे अनंतात विलीन

हरीभाऊ जावळे अनंतात विलीन

0
52

मुंबई प्रतिनिधी । भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार/आमदार हरीभाऊ जावळे यांच्या पार्थिवावर आज रात्री मुंबई येथे विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरीभाऊ जावळे यांचे आज दुपारी मुंबई येथील बाँबे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असतांना निधन झाले होते. याप्रसंगी त्यांच्या सोबत त्यांचे चिरंजीव अमोल जावळे हे उपस्थित होते. अन्य कुणा नातेवाईकांना न बोलविता हरीभाऊंच्या पार्थिवावर मुंबई येथेच अंत्यसंस्कार करण्याचे ठरविण्यात आले. यानुसार आज रात्री आठच्या सुमारास त्यांच्यावर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी त्यांचे चिरंजीव अमोल जावळे व जावई स्नेहल पाटील हे उपस्थित होते. हरीभाऊ जावळे यांची आई, पत्नी व अन्य आप्त हे भालोद येथील निवासस्थानीच होते. त्यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून हा अंत्यविधी पाहिला. दरम्यान, हरीभाऊ जावळे यांच्या निधनामुळे समाजाच्या सर्व स्तरांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound