एरंडोलच्या कोविड सेंटरमध्ये सहा रूग्णांनी केली कोरोनावर मात

एरंडोल रतीलाल पाटील । कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतांना यावर मात करणार्‍यांचीही संख्या वाढत असल्याचे आता दिसून येत आहे. या अनुषंगाने येथील कोविड सेंटरमध्ये आज सहा रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना निरोप देण्यात आला.

एरंडोल येथील कोविड केअर सेंटर मधुन मंगळवारी सहा रूग्णांनी कोरोनावर मात केली. यामध्ये एरंडोल जोहरी गल्लीतील २,कासोदा येथील २,फरकांडे येथील १आणी अंतुर्ली येथील १ याप्रमाणे एकूण ६ कोरोनाबाधित रूग्णांवर यशस्वी उपचार होऊन मंगळवारी दहाव्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
याप्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.फिरोज शेख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. कैलास पाटील, डॉ.विकास जोशी, डॉ.रोहीत वाणी, डॉ.राधीका पालवे व कर्मचारी उपस्थित होते. एरंडोल तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या एरंडोल -४० व ग्रामीण १८ याप्रमाणे एकूण ५८ रूग्णसंख्या आहे. पैकी २९ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यावरून कोरोनातुन बरे होणार्‍या रूग्णांची संख्या लक्षणीय आहे. ही बाब मोठा दिलासा देणारी आहे.

दरम्यान, मंगळवारी एरंडोल येथील ३२ संशयीतांचे स्वँब जळगाव येथे पाठविण्यात आले आहेत तसेच या सेंटरमध्ये ४८रूग्णांवर उपचार होत आहेत.पैकी १३ पॉजिटीव्ह रूग्ण व ३५ संशयीत रूग्ण आहेत. एक पॉजिटीव्ह असलेला खाजगी डॉक्टर खाजगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. जळगाव सामान्य रूग्णालयात९,धुळे२,पुणे१ याप्रमाणे उपचार घेणार्‍या रूग्णांची संख्या आहे.

Protected Content