Home Cities जळगाव प्रभाग समिती सभापती निवडणूक होणार बिनविरोध (व्हिडिओ)

प्रभाग समिती सभापती निवडणूक होणार बिनविरोध (व्हिडिओ)

0
67


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | प्रभाग समिती सभापती निवडणुकीसाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज चार प्रभाग समिती सभापती पदासाठी भाजपा बंडखोर २, भाजपा व एमआयएम यांच्या प्रत्येकी १ उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

 

पीठासन अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. २० एप्रिल रोजी चार ही प्रभाग समितीच्या सभापतीच्या नावाची अधिकृत घोषणा विशेष सभा करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना ४, भाजपा ४ तर एमआयएम ने १ नामनिर्देशन पत्र घेतले होते. या सभेत अधिकृतरीत्या निवड जाहीर करण्यात येणार आहे. आज अनुक्रमे एक ते चार प्रभाग समिती सभापतीपदी रुकसाना बी गबलू खान (भाजपा बंडखोर ), मुकुंद सोनवणे (भाजपा), पार्वताबाई भिल (भाजपा बंडखोर ), सुन्ना बी देशमुख (एमआयएम) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. याप्रसंगी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, नगसेवक नवनाथ दारकुंडे, अॅड. दिलीप पोकळे, नगरसेवक गणेश सोनवणे, जेष्ठ नगरसेवक सदाशिव ढेकळे, भाजप महानगरअध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगसेवक विशाल त्रिपाठी, शुचिता हाडा, दीपमाला काळे, नगरसेवक जितेंद्र मराठे, नगसेवक विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते.

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/322056840015690

 

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/394934059153387


Protected Content

Play sound