Jewelry Theft : प्रवासी महिलेच्या बॅगेतून २ लाखाचे दागिने लांबविले

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव ते चाळीसगाव दरम्यान बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेच्या बॅगमधून २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (Jewelry Theft ) अज्ञात महिलेने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस (Chalisgaon City Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शोभा शिवाजी पाटील (वय-५३) रा. रायगड नगर, सिडको, औरंगाबाद या १६ एप्रिल रोजी १० ते ११ च्या दरम्यान कामाच्या निमित्ताने भडगाव ते चाळीसगाव दरम्यान बसमध्ये प्रवास करत होते. नगरदेवळा दरम्यान एका अनोळखी महिलेने त्यांच्या बॅगेतून २ लाख ३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून (Jewelry Theft ) नेले. हा प्रकार चाळीसगाव बसस्थानकात उतरल्यानंतर शोभा पाटील यांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली. शोभा पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात (Chalisgaon City Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहे.

Protected Content