कोटेचा महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.

आज श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे प्रतिमा पूजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला सांबद्रा यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.व्ही.एस.पाटील व डॉ.जे.व्ही.धनविज उपस्थित होते. या प्रसंगी विधर्थिनिनी कवयित्री बहिणाबाई चे रचीत काव्यवाचन् केले.

कल्याणी पाटील हिने कवयित्री बहिणाबाई यांच्या वेषभूशेत अरे खोप्यामधे खोपा ही कविता सादर केली. तसेच पूजा सपकाळ हीने कशाले काय म्हनु नहि व देवयानी गुरव हिने देव अजब गारोडी ही व शिवानी उपाध्याय हिने मी कोण या कविता सादर केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. माधूरी भुतडा व सूत्रसंचालन प्रा.मनिषा इंगळे यांनी केले. प्रा के. सी. सूर्यवंशी यानी आभार व्यक्त केले. प्रा.जान्हवी तळेगांवकर, प्रा.शरद अग्रवाल व प्रा.निता चोरडिया, शिक्षक व विद्यार्थीनी उपस्थित होते.

Protected Content