गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न

जळगाव , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फोउंडेशन संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च एमबीए महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय स्तरीय ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम यशस्वीरित्या पार पडला.

 

इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च एमबीए महाविद्यालयात  फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा दोन सत्रांमध्ये घेण्यात आला. पहिले सत्र हे डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज अँड रिसर्च नागपूर येथील प्रा. डॉ. रुही बखारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दुसऱ्या सत्रात डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज पुणे येथील प्रा. डॉ. ललित प्रसाद यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन महाविद्यालयाचे प्रा. आफ्रिन खान यांनी केले. डॉ. प्रशांत वारके यांनी वक्त्यांचे आभार मानत त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा नक्कीच सर्व विद्या शाखांना फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला. प्रास्तविक महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी केले. गेस्ट परिचय प्रा. भाग्यश्री पाटील व डॉ. अनुभूती बाउसकर यांनी केले. प्रा. श्रुतिका नेवे व प्रा. अश्विनी सोनवणे आभार मानले.

 

Protected Content