डॉ.आचार्य विद्यालयात शिव महोत्सव साजरा

जळगाव , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात प्राथमिक विभागात शिवजयंतीनिमित्त ऑनलाईन ‘शिवमहोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले. या महोत्सवात नाटिका,एकपात्री, अभिवाचन, नृत्य, पोवाडा,गोंधळ, हस्तलिखित,कविता गायन ,गीतगायन,चित्रकला इ. कला प्रकारांचा समावेश होता.

 

डॉ.आचार्य विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिवमहोत्सवात स्वराज ‘स्थापनेची प्रतिज्ञा’ या वर आधारित नाटिका सादर करण्यात आली. ‘जाणता राजा’, ‘राजमाता जिजाऊ’ या एकपात्री सादर झाल्या. ‘अफजलखान वध’ या वर अभिवाचन करण्यात आले. तसेच ‘जय भवानी,जय शिवाजी’ या गीतावर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. ‘शिवबाचे गोंधळी’ व ‘महाराष्ट्र देशामध्ये हिरा’ हा पोवाडा शिक्षकांनी सादर केला. ‘चाकर शिवबाचे होणार व ‘शिवरायांचा जयजयकार हे गीत विद्यार्थ्यांनी गायले. तसेच ‘शिवरायांचे गड, किल्ले’ यावर आधारित चित्र प्रदर्शन भरवण्यात आले. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ.योगिता शिंपी यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम प्रमुख श्री. छोटू पाटील व श्री. योगेश जोशी होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Protected Content