पोलीसांनी राबविले कोम्बिंग ऑपरेश; २८ संशयित वाहने घेतली ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पोलीसांनी राबविलेल्या कोंबिग ऑपरेशनमध्ये २८ संशयित वाहने आणि एका हद्दपार आरोपीला स्थानिक पोलीसांनी अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी दिली आहे.

शहरातील गेंदालाल मिल परिसर, कांचन नगर, जैनाबाद, पिंप्राळा हुडको, तांबापूरा व मास्टर कॉलनी या परिसरात पोलीसांनी कोंबिग ऑपरेशर राबविले. यावेळी जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे, शनिपेठचे पो.नि. विठ्ठल ससे यांच्यासह १४ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, १४० पोलीस कर्मचारी यांनी संशयास्पद भाग तपासला होता.  आज राबविलेल्या कोबिंग ऑपरेशनमध्ये रेकॉडवरील २४ गुन्हागारांची तपासणी करण्यात आली. तर २८ संशयित व बेवारस असलेले वाहने ताब्यात घेतले . तसेच हद्दपार असलेला एका आरोपीला अटक केली आहे. अशी माहिती माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी दिली आहे.

 

Protected Content