बोदवड नगराध्यक्षपदी शिवसेनेचे आनंदा पाटील

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे आनंदा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून या माध्यमातून नगरपंचायतीवर भगवा फडकला आहे. तर उपनगराध्यक्षपदी संजय गायकवाड यांनी निवड झाली आहे.

बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने बहुमत संपादन केले आहे. १९ जानेवारीला लागलेल्या निकालात शिवसेनेने १७ पैकी ९ जागांसह विजय संपादन करून सत्ता हस्तगत केली आहे. यानंतर आता नगरपंचायतीची धुरा कुणाकडे येणार ? याची सर्वांना उत्सुकता लागली होती.

यात नगराध्यक्षपदासाठी सईद बागवान आणि आनंदा पाटील यांच्या नावांची चर्चा असतांना आनंदा पाटील यांचा पक्षाने उमेदवारी दिली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जाफर शेख आणि योगीता खेवलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, शेवटच्या दिवशी जाफर शेख यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आनंदा पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या योगीता खेवलकर यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

दरम्यान, नगराध्यक्ष निवडीसाठी आज दुपारी १२ वाजता पालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. पीठासीन अधिकारी प्रांत रामसिंग सुलाने यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. यात शिवसेनेचे आनंदा पाटील यांना १० तर राष्ट्रवादीच्या योगीता खेवलकर यांना ७ मते मिळाली. यामुळे बोदवडच्या नगराध्यक्षपदी आनंदा पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या नावाची घोषणा होताच सभागृहाच्या बाहेर शिवसेनेने जोरदार जल्लोष करून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, आजच उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी निवड झाली. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदांची निवड जाहीर होताच शिवसैनिकांनी जोरदार आतषबाजी केली.

Protected Content