यावल तालुक्यातील २२६ उमेदवारांची माघार; ८७ उमेदवार बिनविरोध (व्हिडीओ)

यावल प्रतिनिधी- तालुक्यातील ग्राम पंचायतच्या पंचवार्षिक सार्वत्रीक निवडणुकीची रणधुमाळीला वेग आला असुन ,आज यावल येथील तहसील कार्यालयात उमेदवारांची माघार आणी चिन्ह वाटपाची शेवटची प्रक्रीया पार पडली. 

दरम्यान आपल्या प्रभागातुन उमेदवारांनी माघार घ्यावी व आपल्या विजयाचा मार्ग सोयीस्कर व्हावा याकरिता प्रयत्न करण्यासाठी मोठी गर्दी तहसीलच्या आवारात दिसुन आली . यावल तालुक्यात १५ जानेवारी २०२१ रोजी ग्रामपंचायतच्या सार्वत्रीक निवडणुकीचे बिगुल वाजले. यासाठी तालुक्यातील एकुण ४७ ग्रामपंचायतीचे ४६९ सदस्य निवडुण येणार असुन , यात चोपडा विधान सभा मतदारसंघातीत एकुण १८ ग्रामपंचायत तर रावेर विधानसभा मतदारसंघातील एकुण २९ ग्रामपंचायतींचा यात सहभाग असुन, १ लाख ४o हजार २५ मतदार या निवडणुकीत १५ जानेवारिस मतदान करणार असुन दिनांक १८ जानेवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज माघारीच्या दिवसी एकुण २२६ उमेदवारांनी आपले उमेदवारीची माघार घेतली असुन , एकुण ८७ उमेदवार हे बिनविरोध निवडुन आली आहेत यात सर्वाधिक बिनविरोध उमेदवार हे मारूळ ग्रामपंचायतीतुन  निवडुन आले आहे.

बिनविरोध निवडुन आलेली उमेदवार संख्या व गाव पुढीलप्रमाणे मारूळ १० आमोदे६ किनगाव४वढोदे प्रगणे यावल ६नावरे ५ आडगाव४टाकरखेडा   ६ मोहराळे४ पिंप्री४मनवेल३ कासवे ३ पिंपरूड ३ अंजाळे ३ बोरावल खुर्द२वनोली  २ अट्रावल२ विरोदा२उंटावद २कोरपावली १महेलखेडी १ चिंचोली १वढोदे प्र सावदा १ हंबड्री१दुसखेडा १कोसगाव १ पिळोदे ग्रुप१ निमगाव १कोळवद१नायगाव१ बोरावल खुर्द१ अशी गावातील उमेदवार हे बिनविरोध निवडुन आले आहे.

तर एकुण ९०५ उमेदवार हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरते आहे या सर्व उमेदवारांचे चिन्ह वाटप करण्यात आले असुन उद्यापासुन गावागावात प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. संपुर्ण निवडणुक प्रक्रीया शिरपुर विभागाचे प्रांत अधिकारी व यावल तालुका निवडणुकीचे प्रमुख निरिक्षकक व्ही.व्ही.बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक निर्णय अधिकारी महेश पवार , निवासी नायब तहसीलदार आर के पवार, नायब तहसीलदार आर .डी. पाटील व २७ निवडणुक निर्णय अधिकारी यांचा यात सहभाग आहे.

https://www.facebook.com/508992935887325/videos/250675516407593

Protected Content