जळगाव शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा

 

जळगाव, प्रतिनिधी । वाघुर धरणावरून शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख जलवाहिनीला मेहरुण गोसावी मळा जवळ मोठी गळती लागली होती. पाणीपूरवठा विभागाने आज दुरुस्ती हाती घेतली आहे. यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक  दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

मेहरुण गोसावी मळा जवळील १२००
मीमी व्यासाची गिरणा टाकीला जोडली जाणारी मुख्य जलवाहिनी फुटली. त्यानंतर त्वरीत पाणीपूरवठा विभागाने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. शहरात होणार पाणीपुरवठा एक  दिवस  पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी यांनी कळविली आहे .

बुधवार ६ जानेवारी या भागात पाणीपुरवठा

नटराज टाकी ते चौघुले मळा, शनीपेठ, बळीरामपेठ, शनीपेठ, नवीपेठ, हौसिंग सोसायटी, प्रतापनगर, गेंदालाल मिल, खडके चाळ, इंद्रप्रस्थ नगर, के. सी. पार्क, गेंदालाल मिल हुडको, रिंगरोड, भोईटे नगर, भिकमचंद जैन नगर, आकाशवाणी, जुनेगाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, हेमुकलाणी टाकीवरील परिसर, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्‍वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रिम कॉलनी, डी. एस. पी. टाकीवरील तांबापुरा, गणपती नगर, आदर्श नगर, प्रभात कॉलनी, ब्रुकबॉण्ड कॉलनी या भागात पाणीपुरवठा होणार आहे.

गुरुवार ७ जानेवारी या भागात पाणीपुरवठा

वाल्मिकनगर, कांचननगर, दिनकर नगर, असोदा रोड, रामेश्‍वर कॉलनी व परिसर, मोहननगर, नेहरूनगर, हरिविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी, खोटेनगर, गेंदालाल मिल, शिवाजीनगर हुडको, प्रजापत नगर, एस.एम.आयटी परिसर, योगेश्‍वर नगर, हिरापाईप, शंकरराव नगर, खेडीगाव परिसर, तांबापुरा, शामाफायर, वाघनगर, हरिविठ्ठल नगर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर, जिल्हारोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, ऑफिसर क्‍लब.

Protected Content