ब्रेकींग : साखळी बॉंबस्फोट प्रकरणात ३८ आरोपींना फाशी

अहमदाबाद- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटातील ४९ पैकी तब्बल ३८ आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. एखाद्या खटल्यात इतक्या जणांना पहिल्यांदाच फाशीची शिक्षा मिळाल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

अहमदाबादमध्ये जुलै २००८मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज न्यायालयाने निकाल दिला आहे. यात एका तासात २१ बॉम्बस्फोट   घडवल्याप्रकरणी ४९ पैकी ३८ दोषींना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ८ फेब्रुवारी रोजी विशेष न्यायालयाने या आरोपींना दोषी ठरवले होते. तर २८ जणांची या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. याप्रकरणी स्पेशल कोर्टात १३ वर्ष सुनावणी सुरू होती. अखेर आज या प्रकरणाचा निकाल आला आहे.

या स्फोटात एकूण ७८ आरोपी होते. त्यातील एक आरोपी माफीचा साक्षीदार बनला होता. त्यामुळे ७७ आरोपी उरले होते. या प्रकरणी तब्बल ११६३ लोकांची साक्ष नोंदवण्यात आली होती. पोलीस आणि तपास यंत्रणांनी ६ हजार पुरावे कोर्टात सादर केले होते.

अहमदाबादच्या विशेष न्यायालयाचे न्यायामूर्ती अंबालाल पटेल यांनी ६,७५२ पानी निकालपत्रं तयार केलं. कोर्टाने या बॉम्बस्फोटप्रकरणी २८ जणांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. दोषींना भादंवि कलमाच्या ३०२ (हत्या करणे) आणि यूएपीएअंतर्गतही त्यांनी दोषी ठरवण्यात आलं आहे.

 

 

 

Protected Content