अमळनेर येथील शिवजन्मोत्सव सोहळ्यास मिनल शहाची राहणार प्रमुख उपस्थिती

अमळनेर, , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मानाची सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यास मराठी बिग बॉस ची तारका मिनल शहा उपस्थित राहणार आहे.

अमळनेरकरांची मानाची सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या प्रांगणात शनिवार १९ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याला मराठी बिग बॉस ची तारका मिनल शहा उपस्थित राहणार आहे. तर विविध महापुरुष, महानायिकांच्या वेशात येणाऱ्या सर्व मुलामुलींना यावेळी बक्षिसे देण्यात येणार आहेत.अमळनेरच्या मानाची सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे दरवर्षी भव्य मिरवणूक शहरातून निघते.मात्र यंदा कोरोनाच्या नियमांच्या पार्श्वभूमीवर समितीतर्फे मिरवणूकऐवजी छ. शिवाजी महाराज नाट्यगृह येथे जागेवरच महिला,युवती आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे.शिव जन्माचा पाळणा यावेळी मराठी बिगबॉस स्टार मिनल शहा हिच्या हस्ते हलवण्यात येईल.तर यावेळी विविध क्षेत्रातील महिला शिवजन्माचा पाळणा गातील. तसेच शिवजन्मानिमित्त राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ,बाल शिवाजी राजे यांच्या रथासमोर यावेळी आदिवासी सुप्रसिद्ध जय बजरंगबली टिपरी डान्स पथक विविध कसरती करून आंनदोत्सव साजरा करतील. यावेळी सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कुल चे विद्यार्थी पोवाडा व नृत्य सादर करतील. खान्देश रक्षक संघटनेचे निवृत्त आर्मी मॅन सुव्यवस्था सांभाळतील तर शिजन्मोत्सवासाठी येणाऱ्या सर्व शिवभक्तांनी कोविड नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा असे आवाहन अमळनेर ची मानाची सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीतर्फे करण्यात आलेले आहे.

Protected Content