‘त्या’ ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण: माजी सरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल

पहूर ता जामनेर प्रतिनिधी । गैरव्यवहाराला विरोध करणार्‍या वाकडी येथील बेपत्ता झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण करण्यात आले असून या प्रकरणी माजी सरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्तांत असा की, वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद लक्ष्मण चांदणे हे दि १९ मार्च रोजी सकाळी नऊ पासून बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी विजय लक्ष्मण चादणे यांनी बेपत्ता झाल्याची नोंद पहूर पोलीसात करून घातपात केल्याचा संशय व्यक्त केला होता. तर तीन संशयितांची नावे दिली होती. यात माजी सरपंच व विद्यमान सदस्य चंद्रशेखर पदमाकर वाणी यांच्या नावाचा समावेश होता. चंद्रशेखर वाणी हा प्रमुख सूत्रधार असून त्याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी राजेंद्र लक्ष्मण चांदणे यांनी पोलीसांकडे मागणी लावून धरली होती. यावरून पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली. यावरून आज गुन्हा दाखल करण्यात आला.

विनोद लक्ष्मण चांदणे नेहमी प्रमाणे सकाळी नऊ वाजता घरून निघाला. माजी सरपंच चंद्रशेखर वाणी, नामदार तडवी, विनोद देशमुख ( रा. वाकडी) व महेंद्र राजपूत (रा. शेळगाव, तळेगाव)या चौघांनी वाकडी धरणाच्या भिंती जवळ विनोदची दुचाकी आडवीली.त्याला जबर दुखापत करून त्याला जिवे ठार मारण्यासाठी अपहरण केले आहे. असे विनोद चा भाऊ राजेंद्र लक्ष्मण चांदणे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. त्यावरून वरील संबंधित चौघांविरूध्द भादवी.३६३,३६४,१२० ब,३४१,अट्रासिटी३(२)व्ही प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद राजपूत, विनोद देशमुख व नामदार तडवी यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर माजी सरपंच चंद्र शेखर वाणी यापूर्वी ही तीन गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तपास डिवाएसपी ईश्‍वर कातकडे व सपोनि दिलीप शिरसाट करीत आहे.तसेच चंद्रशेखर वाणीच्या अटकेकडे लक्ष लागून आहे.

पाचोरा विभागाचे डिवाएसपी ईश्‍वर कातकडे व साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट या घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी तपासाची खबरदारी घेत असून दरोरोज वाकडी त संशयितांना घेऊन चौकशी व विचारपूस करण्यात येत आहे.

Add Comment

Protected Content