डोंगरदे येथे आरोग्य खात्याच्या पथकाने ठोकला तळ

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगरदे येथे लागोपाठ तीन बालकांच्या मृत्यूनंतर आरोग्य खात्याचे पथक तळ ठोकून आहे.

डोंगरदे हे आदिवासी बहुल गाव सध्या तीन बालकांच्या अज्ञात आजाराने अचानक झालेल्या मृत्युने चर्चेत आले आहे. यामुळे आरोग्य विभागा समोर मोठे आव्हान उभे केले असुन, या करीता जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबीता कमलापुरकर आणी डॉ. प्रमोद गांडाळ( हिवताप विभाग संचालक नाशिक) जिल्हा साथ वैधकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील, डॉ. बाळासाहेब वाभळे( साथरोग तज्ञ जळाााव) तसेच आरोग्य विस्तार अधिकारी अजय चौधरी, यावल तालुका वैधकीय अधिकारी डॉ. हेमन्त बर्‍हाटे, यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक आरोग्य अधिकारी व कर्मचारी हे डोंगरदे गावात तळ ठोकुन आहेत.

या आरोग्य पथकाने काल अगदी मध्यरात्री ६९२ लोकवस्ती गावातील ९१ घरा मधील आजाराने ग्रासलेल्या बालकांच्या रक्ताची तपासणी केली व तात्काळ औषधपचाऱ करण्यात आले या कामी त्यांना डोंगर कठोरा येथील सामाजीक कार्यकर्ते व डोंगरदे येथील पोलीस पाटील आमीरा सकर्‍या पावरा यांनी विशेष सहकार्य केले. यासाठी यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बर्‍हाटे यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

Add Comment

Protected Content