‘द केरला स्टोरी’ सुरू असतांना दगडफेक करणार्‍यांवर कारवाई करा : खा. खडसे

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील श्रीराम टॉकीज मध्ये ‘द केरला स्टोरी’ चित्रपट चालू असतांना दगडफेक करणार्‍या समाजकंटकांवर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आज खासदार रक्षाताई खडसे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

 

या संदर्भातील वृत्त असे की, फैजपूर येथील श्रीराम टॉकीज मध्ये ‘द केरला स्टोरी’ हा बहुचर्चित चित्रपट ३ दिवसापूर्वी चालू असतांना काही समाजकंटाकांद्वारे चित्रपट गृहाच्या पत्री छतावर मोठ्यासंख्येने दगडफेक केली होती. यावेळी चित्रपट गृहात मोठ्यासंख्येने उपस्थित महिला वर्ग घाबरून, त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. तीन  दिवस उलटून सुद्धा सदर समाजकंटाकांचा शोध घेऊन त्यांच्यावर पोलिसांतर्फे कार्यवाही करण्यात आली नाही तेव्हा स्थानिक नागरिकांनी फैजपूर पोलीस स्टेशन येथे आंदोलन केले होते.

 

दरम्यान, या प्रकरणी  आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी फैजपूर येथे भेट देऊन सदर गुन्हेगारांचा लवकरात लवकर शोध लावून कठोर कार्यवाही करणे बाबत संबंधित स्थानिक पोलीस प्रशासनास सूचना केल्या. तसेच त्यांनी  दगडफेकीची घटना घडलेल्या श्रीराम टॉकीज येथे पाहणी केली, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री ना. गिरीश महाजन व जळगांव पोलीस अधिक्षक यांना सदर घटनेची दूरध्वनीद्वारे सविस्तर माहिती दिली व स्थानिक पोलिसांची तक्रार करून तत्काळ उचित कार्यवाही करण्याची मागणी केली.

 

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी कुणाल सोनवणे, माजी जि.प.सदस्य भरत महाजन, महिला आघाडी तालुकाध्यक्ष जयश्री चौधरी, सावदा माजी नगरसेविका सौ. रंजना भारंबे, सौ.सारिका चव्हाण, सावदा भाजपा शहराध्यक्ष जे.के.भारंबे, फैजपूर माजी नगराध्यक्ष पिंटू राणे, .बी.के.चौधरी, फैजपूर भाजपा शहराध्यक्ष अनंत नेहेते, नितीन नेमाडे, बापू वाघुळदे, नरेंद्र नारखेडे, पप्पू चौधरी, पंकज नारखेडे, कालिदास ठाकूर, डॉ.शेखर पाटील, सावदा माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, संतोष परदेशी, महेश अकोले, योगेश भंगाळे, योगेश बोरोले, अनिरुद्ध सरोदे, रितेश पाटील व स्थानिक ग्रामस्थ, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content