Home धर्म-समाज आषाढी वारीत आमदार अमोल जावळे यांची पंढरपूर येथे गुरु जगन्नाथ अंजाळेकर महाराजांच्या...

आषाढी वारीत आमदार अमोल जावळे यांची पंढरपूर येथे गुरु जगन्नाथ अंजाळेकर महाराजांच्या मठास भेट 

0
2

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी पंढरपूर येथे गुरु वर्य ह.भ.प. जगन्नाथ अंजाळेकर महाराज वारकरी सेवा मंडळाच्या मठास भेट देत वारकरी माऊलींची आस्थेने विचारपूस केली. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात चंद्रभागेच्या तीरावर पोहोचलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहितीही त्यांनी जाणून घेतली.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करत पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी पंढरपूर येथील गुरु वर्य ह.भ.प. जगन्नाथ अंजाळेकर महाराज वारकरी सेवा मंडळाच्या मठास भेट देऊन वारकरी परंपरेप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. यावेळी त्यांनी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेल्या वारकरी माऊलींची आत्मीयतेने विचारपूस केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी संस्थेचे गादीपती ह.भ.प. गुरु वर्य धनराज महाराज अंजाळेकर तसेच विश्वस्त मंडळासोबत आमदार जावळे यांनी सविस्तर चर्चा केली. वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निवास, भोजन, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेत त्यांनी सेवा उपक्रमांचे कौतुक केले. वारकरी संप्रदायाची अखंड सेवा ही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मठ परिसरातील श्री विठोबा-रखुमाईच्या चरणी आमदार अमोल जावळे यांनी मनोभावे दर्शन घेत राज्यातील बळीराजा, युवक, माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व जनतेच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. संत परंपरेचा आदर्श आणि विठ्ठल भक्तीचा संदेश समाजात अधिक दृढ व्हावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या भेटीदरम्यान नरेंद्र नारखेडे, हिरालाल चौधरी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून भाविकांना दिल्या जाणाऱ्या सेवाकार्याचे कौतुक करत वारीच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound