अज्ञात वाहनाच्या धडकेने शेतमजूर महिलेचा मृत्यू

Crime

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पथरी – वडली रोडवर शेतातील 50 वर्षीय महिला शेतातून काम करून घरी परतत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. याप्रकरणी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, लताबाई सुरेश धनगर (वय-50) रा. पाथरी ता. जळगाव ह्या शनिवारी 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास जावखेडा शिवारातील शेतातून काम करून परतत असतांना अज्ञात वाहनाच्या धडक दिली. या धडकेत महिलेला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना वडली व पथरी या गावादरम्यानच्या रस्त्यावर झाली. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत महिलेच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परीवार आहे.

Protected Content