सावदा येथे मंगळवारी जलशक्ती अभियान शेतकरी मेळावा अन प्रदर्शनी

download

फैजपूर, प्रतिनिधी | शेतकरी समृद्ध होण्यास आज गरज आहे पाण्याची. हेच ध्येय समोर ठेऊन जिल्हाधिकारी व कृषि विज्ञान केंद्र पाल यांच्या संयुक्त विद्यमाने ३ सप्टेंबर रोजी सावदा येथे शेतकरी मेळावा प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

 

जलशक्ती अभियान हा केंद्र शासनाचा महत्वाकांशी उपक्रम आहे. जिल्ह्यातून रावेर व यावल तालुके यात समविष्ट आहेत. दोनही तालुक्यात गेल्या काही वर्षांत भुजलस्तर झपाट्याने कमी होत आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न ह्या अंतर्गत होणार आहेत.

दि.३ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ५.०० पर्यंत कुलसुमबाई मंगल कार्यालय, सावदा (ता. रावेर) येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत. केंद्रिय अधिकारी तसेच जिल्हा स्तरीय सर्व अधिकारीही उपस्थित रहाणार आहेत. जलसंधारण, मृद संधारण तसेच शेती संदर्भातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी विशेष कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. परीसरातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content