अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत जाहीर करा; युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सावदा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव धनंजय चौधरी, जिल्हाध्यक्ष भुपेश जाधव यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले.

 

रावेर तालुक्यात ६ जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर ढगफूटी होवून अतिवृष्टी झाली होती. यात रावेर शहर, रसलपूर, शिंदखेडा, रंमजीपुर, खिरोदा प्र., रावेर भागात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान झाले होते.  रावेर तालुक्यात वारंवार अतिवृष्टी व चक्रीवादळाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. व त्यांच्या उभ्या पिकाची अपरिमित हानी होत आहे. साधारणतः दरवर्षीच शेतकऱ्यांना अशा संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी मोडून पडण्याची शक्यता आहे..

त्यातच रावेर तालुक्यात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने सातपुड्यातील सर्वच नद्यांना मोठा पूर आला. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून २० जनावरे वाहून गेलेले आहेत. तसेच तालुक्यातील रमजीपूर, रावेर, खिरोदा प्र.रावेर, रसलपूर, शिंदखेडा, मोरव्हाल या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी घुसून १४५ घरांचे अतोनात नुकसान झालेले आहे. दरम्यान, मयताच्या वारसांना तातडीने ५ लाख रूपयांची मदत देण्यात यावी, जनावरे वाहून गेले तर काहि ठिकाण घरांची पडझड झाली आहे. यांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

Protected Content