रावेरात जिल्हाधिकाऱ्यांचा ‘जनता दरबार’उपक्रमात ३० तक्रारींचे निवारण

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्हाधिकारी अमन मित्तल हे रावेर शहरात येत असल्याची माहिती मिळताच तहसील कार्यालयात तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांची एकच गर्दी झाली होती. जिल्हाधिकारी यांनी यावेळी जनता दरबार आयोजित करून प्रत्येकाशी वयक्तिक संधी देत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सर्वांच्या समस्येच निवारण केले. यामध्ये बहुतांश तक्रारी नगरपालिका व पंचायत समिती संदर्भात होत्या.

 

जिल्हाधिकारी अमन मित्तल रावेर तालुका दौऱ्यावर होते. सुरुवातीला त्यांनी कृषी उपन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्‍यांची बैठक घेऊन केळी संदर्भात समस्या सोडविण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी रावेर तहसिल कार्यालयात आले. त्याठिकाणी देखिल विविध समस्या घेऊन रावेर शहरासह परिसरातील नागरीकांची एकच गर्दी झाली  होती. यामध्ये रस्ते, अतिक्रमण, स्वच्छता, घरकुले, निकृष्ट कामे यांच्या समस्या घेऊन नागरिक येथे आले होते. यावेळी प्रत्येक नागरीकांच्या समस्या ऐकून घेत तात्काळ सोडण्याचे जिल्हाधिकारी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आदेश दिले. एक तासात समस्येच रूपांतर जनता दरबारामध्ये झाले होते. सुमारे तिस तक्रारी व निवेदन जिल्हाधिकाऱ्‍यांनी स्विकारले. यावेळी तालुक्यातील सर्व महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.

Protected Content