कोरपावली येथील घरकूल प्रकरणी दाखल होणार गुन्हे

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथील घरकुलांच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील कोरपावली येथील बोगस इंदीरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांची चौकशी करून संबधीतांवर गुन्हे दाखल करावे या मागणी साठी कोरपावली येथील सामाजीक कार्यकर्ते अनिल तुळशीराम इंधाटे यांनी यावल पंचायत समिती यांनी मागील महीन्यात चार दिवस आमरण उपोषण केले होते. या उपोषणाची सांगता होत असतांना यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे व ग्राम पंचायत विस्तार अधिकारी मोरे यांनी उपोषणकर्त्यांना १५ दिवसाच्या आत जिल्हा परिषदच्या वरिष्ठांकडे चौकशीचा अहवाल पाठवुन आदेशावर न कार्यवाही करून असे लेखी आश्‍वासन दिले होते. मात्र १५ दिवसांपेक्षा अधिक काळ संपल्यावर उपोषणकर्त्यांनी प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना वारंवार जाब विचारून कार्यवाही बाबतची माहिती विचारली. या अनुषंगाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक यांनी यावल च्या गटविकास प्रकल्प अधिकारी यांना दिनांक २ / ४/२०१९ पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की तक्रारदार अनिल तुळशीराम इंधाटे रा. कोरपावली यांनी आपल्या तक्रार अर्जा मध्ये नमुद केले आहे की कोरपावली गावात सन२००९ते १०व २०१३ते १४या वर्षामध्ये १) दयाराम मुरलीधर सोनवणे, २) किशोर वसंत भालेराव या दोन लाभार्थ्यांनी इंदीरा आवास योजने अंतर्गत घरकुलचा लाभ देण्यात आला असुन त्यांना हप्ते वितरीत करण्यात आलेले आहेत. तसेच सन२०१६ते १७या वर्षामध्ये सुध्दा याच लाभार्थ्याना लाभ दिल्याचे नमुद करून शासनाची फसवणुक करणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांचे स्थानिक चौकशी करून त्यांच्या विरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी तक्रार देखील लोकशाही दिनी केली होती.

प्रस्तुत प्रकरणी नियमानुसार योग्य ती तात्काळ कार्यवाही करून संबधीत तक्रारदारास परस्पर कळविण्यात यावे व संबधीता दोषीविरूद्ध उचित कार्यवाही करून प्रकरण अंतीम खुलाशासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभाग जळगाव कडे पाठवावे असे या आदेशात म्हटले आहे. या संदर्भात अधिक माहीती घेतली असता कोरपावली घरकुल घोटाळ्यात अनेक जण अडकण्याची शक्यता आहे.

Add Comment

Protected Content