यावल कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ९५ अर्ज दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० एप्रिल रोजी होणार्‍या १८ संचालक मंडळाच्या निवडीसाठी होवु घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ९५ उमेदवारांनी आपले १४३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

 

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज पर्यंत उमेदवारी अर्जांची संख्या १४३ झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांसह सूचक अनुमोदक व समर्थकांची मोठी गर्दी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक कार्यालयात उसळली होती.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकी साठी सोमवारी  शेवटच्या दिवशी ९५  उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.

 

मतदार संघ निहाय एकूण दाखल झालेले उमेदवारी अर्ज असे विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघ ६७,  ग्रामपंचायत मतदार संघ ४५, व्यापारी मतदारसंघ १६ ,हमाल तोलारी मतदारसंघ १३ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.   ही माहिती पत्रकारांना या निवडणूकीचे निर्णय अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापाल पी. एम. चव्हाण यांनी दिली आहे. संपुर्ण निवडणुकीचे निरिक्षक म्हणुन तहसीलदार महेश पवार हे काम पाहात आहे . उमेदवारांचे अर्ज छाननी व माघारीनंतर या तालुक्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष वेधणार्‍या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Protected Content