किनगाव-डांभुर्णी दरम्यान वृक्षांची कत्तल !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या नावाखाली किनगाव ते डांभुर्णीच्या दरम्यान अनेक वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात येत असून यावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

तालुक्यातील किनगाव ते डांभुर्णी रस्त्यावरील कॉंक्रीटीकरणाचे काम वेगाने करण्यात येत असुन , मात्र साईड पट्टया स्वच्छेतेच्या नांवाखाली ढेरेदार जिवंत वृक्षांची कत्तल करण्यात येत असल्याने परिसरातील पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .

यावल तालुक्यातील किनगाव ते डांभुणी या जळगावकडे जाणार्‍या राज्य महामार्गावरील रस्त्याचे कॉंक्रीटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. या मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या कडेला येणार्‍या साईडपट्टया मोकळ्या व स्वच्छ करण्याच्या नांवाखाली माफियांच्याा माध्यमातुन मोठमोठी विस ते पंचविस वर्षापुर्वीची विविध प्रकारच्या वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे. याची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Protected Content