विवाहितेचा छळ : पतीसह सासु-सासरे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चारचाकी घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्याच्या आरोपातून पतीसह सासू आणि सासर्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दहिगांव संत ता. पाचोरा येथील दिपाली हिचा विवाह कुसुंबा ता. जि. जळगाव येथील धनराज नामदेव जाधव यांच्याशी दि. २७ एप्रिल २०१४ रोजी झाला होता. लग्नानंतर एक चांगली वागणुक दिल्यानंतर किरकोळ कारणावरून दिपाली हिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. दिपाली हिचा पती इस्टेट ब्रोकर असल्याने कामावर जाण्यासाठी पती धनराज जाधव व सासरच्या मंडळींकडुन चारचाकी कार घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावे अशी मागणी दिपाली हिच्याकडे होवु लागली. या मागणीसाठी दिपाली हिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला.

अखेर सततच्या त्रासाला कंटाळून दिपाली हिने फिर्याद दिली. यानुसार, पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये धनराज नामदेव जाधव (पती), नामदेव मोतीराम जाधव (सासरे) व शांताबाई नामदेव जाधव (सासु) सर्व रा. कुसुंबा ता. जि. जळगाव यांचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलिस करत आहेत.

Protected Content