संतापजनक : पिडीतेची जिल्हा रुग्णालयातही अहवेलना

mahila 300x162 1

 

जळगाव (प्रतिनिधी) रामानंदनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करतांना सहन कराव्या लागलेल्या अपमानानंतर बलात्कार प्रकरणातील पिडीतेला जिल्हा रुग्णालयातही अहवेलनेला सामोरे जावे लागल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. वैद्यकीय अहवालावर सही करण्यावरून सिव्हील मेडिकल ऑफिसर आणि गायनाकोलॉजिस्ट यांच्यात सही करण्यावरून सुरु असलेल्या वादामुळे पिडीतेला तब्बल ३६ तास रुग्णालयात थांबून ठेवण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे पिडीतेलाच विविध कागदपत्रांची झेरॉक्स काढायला बाहेर पाठविण्यात आल्याचाही प्रकार घडला आहे. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर आज दुपारी २ वाजेच्या सुमारास पिडीत युवतीची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली.

 

या संदर्भात अधिक असे की, लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी येथील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्यासह त्यांची पत्नी व वडीलांविरुद्ध रामानंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पिडीतेला रात्री १०:३० वाजेपासून तर मध्यरात्री २ वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि पिडीत तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी 24 रोजी पहाटे ३ वाजेला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. पिडीत तेव्हापासून पासून तर आज 25 जूनच्या दुपारी दोन वाजेपर्यंत रुग्णालयातच थांबून ठेवण्यात आले होते.

 

गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना देखील पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी संबंधी कागदपत्रांवर वैद्यकीय अधिकारी यांनी साक्षरी करण्यासाठी ‘पहिले तू , पहिले तू ‘ अशी भूमिका घेतल्यामुळे गेल्या 36 तासांपासून वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली पीडिता जिल्हा रुग्णालयातच होती. यामुळे पिडीत तरुणीसोबत असलेल्या महिला कर्मचारीला देखील अडचणींना सामना करावा लागला. प्रत्येक नमुन्याच्या वेळी सीएमो किंवा वैद्यकीय अधिकारी सह्या करण्यासाठी सरळ हात झटकत होते. गायनाकॉलॉजिस्ट महिला डॉ.भोळे आणि सिव्हील मेडिकल ऑफिसर डॉ.दहीतोंडे यांच्यामध्ये सही करण्यावरून वाद होता. दोघंही जण पहिले तूम, पहिले तूम’ असे म्हणत होते. दरम्यान, रामानंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी हस्तक्षेप करत जिल्हा शल्यचिकित्सक अधिकाऱ्यांना फोन लावून याबाबत माहिती दिली. त्यानंतर अखेर 36 तासानंतर गायनॅकोलॉजिस्ट महिला डॉ. घोडे आणि सीएमो डॉक्टर दहातोंडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार अहवालावर स्वाक्षऱ्या केल्या. या ठिकाणी देखील दोघं डॉक्टर आधी तुम्ही सही करा म्हणून एकमेकाला सांगत होते. दरम्यान, पिडीतेची जिल्हा रुग्णालयातही झालेल्या अहवेलनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content