महिला डॉक्टरला व्हाट्सॲपवर पाठवले अश्लील संदेश ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील एका प्रसिद्ध महिला डॉक्टरास सोशल मिडीयाच्या व्हाट्सॲपद्वारे एका व्यक्तीने अश्लील संदेश पाठवल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी रविवार, ११ सप्टेंबर रोजी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील एका हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरांच्या व्हाट्सॲपवर अज्ञात व्यक्ती गेल्या २७ ऑगस्ट पासून २०२२ पासून अश्लील संदेश पाठवीत व्हाईस कॉलिग करीत घाणेरड्या भाषेत बोलत होता. ८७८८६५ ८२७६ या अनोळखी क्रमाकांहून अज्ञात व्यक्ती महिला डॉक्टरला त्रास देत होता. त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरने संबधित प्रकाराबाबत जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रविवार, ११ सप्टेंबर रोजी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.

Protected Content