
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ५० वर्षीय महिला कडपे बदलवीत असतांना घरात घुसून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे, याप्रकरणी रविवार, ११ सप्टेंबर रोजी एका जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ५० वर्षीय महिला दि. १ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास नळाचे पाणी भरल्यानंतर घरामध्ये कपडे बदलवीत होती. यावेळी संशयित राजकुमार मिश्रा याने घरात अनधिकृत प्रवेश करीत महिलेसोबत अश्लिल संवाद साधला. तसेच पिडीत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून रविवारी शहर पोलिसात राजकुमार मिश्रा याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहाय्यक फौजदार संगीता खांडरे ह्या करीत आहेत.



