पाचोऱ्यात भाजपा आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भा.ज.पा. युवा मोर्चा व महिला आघाडीच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम काल उत्साहात संपन्न झाला.

यात माँ साहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व महाराष्ट्रातील विविध गड-किल्ले यांच्या वर आधारित वकृत्व, निबंध, चित्रकला, गीत गायक, पोवाडा गायक, रांगोळी, वेशभूषा आणि गड किल्ले बनवणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि. ०७ मार्च २०२२ सोमवार रोजी अटल भारतीय जनता पार्टी कार्यालय, पाचोरा येथे जळगांव मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील, भा.ज.पा. युवानेते अमोल शिंदे, व भा.ज.पा. युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यामध्ये प्रत्येक स्पर्धेत प्रथम पाच विजेते स्पर्धक खालील प्रमाणे –

निबंध स्पर्धा –

श्रावणी संदीप पाटील, खुशी श्रीकांत भोई, अक्षदा जगदीश कुमावत, रेखा श्रीराम पाटील, दीक्षा सोनवणे

चित्रकला स्पर्धा –

मितेश विलास पाटील, निशांत समाधान पाटील, सिद्धी सचिन सोनवणे, अमेय सचिन ब्राह्मणकर, मोहित आर मिस्तरी

रांगोळी स्पर्धा – पुनम अरुण कुमावत, ललिता हेमराज पाटील, गायत्री सुभाष पाटील, निशा ईश्वर पाटील, दीक्षा राजेंद्र चंदणे

गीत गायन स्पर्धा – सिद्धी विनोद कुलकर्णी, श्रद्धा आनंद बोरसे, अंकिता अशोक माळी, प्राची विलास पाटील, रोहित परदेशी

गड किल्ले स्पर्धा – वेदांत रवींद्र कोळी, दिपाली नितीन पाटील, आकाश पाटील, तनवी रणजीत पाटील, राधिका शंकर पिंपळे

वकृत्व स्पर्धा – काजल संजय जैन, प्रणवी ललित पाटील, भव्या प्रदीप सोनवणे, मिताली प्रणय पुजारी, कल्याणी अनिल महाजन

वेशभूषा स्पर्धा – श्रद्धा सचिन सूर्यवंशी, दिव्येश गिरीश दुसाने, तनुष पिंटू निकम, श्रावणी हितेश महाजन, देवांशी परेश वाणी

पोवाडा गायन स्पर्धा – पल्लवी शशिकांत लासूरकर, स्वानंद संदीप सराफ, अनुज भागवत कोरे, पूर्वा किशोर पाटील, दिशा दिनेश पाटील

या सर्व स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांक पटकवलेल्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आले. सहभाग नोंदविणाऱ्या इतर ८८० स्पर्धकांना सहभाग घेतल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.

या बक्षिस वितरण समारंभाप्रसंगी स्पर्धकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली असता भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास भेटवस्तू मिळाल्याने यावेळी स्पर्धकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

याप्रसंगी उपस्थित व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, शहराध्यक्ष रमेश वाणी, पंचायत समिति सदस्य बन्सीलाल पाटील, ज्ञानेश्वर सोनार, विधानसभा क्षेत्रप्रमुख हिम्मतसिंग निकुंभ, तालुका सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील, शहर सरचिटणीस दिपक माने, भा.ज.पा. चिटणीस जगदीश पाटील, भा.ज.पा. युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, भा.ज.पा. युवा मोर्चा शहराध्यक्ष समाधान मुळे, भा. ज. पा. युवा मोर्चा सरचिटणीस योगेश ठाकूर, कुमार खेड़कर, उपाध्यक्ष पिंटू चौधरी, भावेश पाटील,नितिन पाटील, मच्छींद्र पाटील, अमोल नाथ सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content