सडावण येथे पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमीपूजन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील सडावण गावात जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ४८ लाख रूपयांची निधी मंजूर करून पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते करण्यात आला आहे.

यावेळी गावात आयोजित करण्यात आलेल्या भूमीपूजन सोहळ्यात अंतर्गत गावात रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, आमदार निधीतुन सात्वन शेड व पेव्हर ब्लॉक बसविणे व जलजीवन मिशन अंतर्गत गावात पाणीपुरवठा योजना करणे यासह इतर १ कोटी ७३ लाख रूपयांच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. पाणीपुरवठा योजनेची प्रशासकीय मान्यता देखील झाली असून केवळ टेंडर प्रोसेस बाकी आहे. गावासाठी पाणीपुरवठा योजनेसह समाधानकारक कामे मिळाल्याने ग्रामस्थांनी आमदारांचे जल्लोषात स्वागत करून जंगी सत्कार केला. यावेळी आमदार अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना मतदारसंघातील विकास कामांचा आढावा मांडून येणाऱ्या काळात पुरेश्या विकासकामांमुळे अनेक गावे समस्यांमुक्त झालेली असतील अशी ग्वाही दिली.

यावेळी सरपंच पंढरीनाथ भिल, प्रकाश पाटील, निंबा पाटील, जिजाबराव पाटील, गुलाब पाटील, मधुकर पाटील, निंबा पाटील, अशोक पाटील, मधुकर पाटील, सुपडू पाटील, विजय पाटील, दिलीप पाटील, लोटन पाटील, अशोक पाटील, रावसाहेब पाटील, प्रकाश पाटील, विनोद पाटील, नामदेव पाटील, बाळू पाटील, हिरामण पाटील, रत्‍नाबाई यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content