गुरांची चोरी करणारा संशयिताला सुप्रिम कॉलनीतून अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । जळगाव आणि धुळे जिल्ह्यात गुरे चोरीच्या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी अमजद शेख फकीरा रा. सुप्रीम कॉलनी याला सुप्रिम कॉलनीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. संशयिताने चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी मारवड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्यात गुरे चोरीचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने आज बुधवारी ८ सप्टेंबर रोजी कारवाई करत संशयित आरोपी अमजद शेख फकीरा रा. सुप्रिम कॉलनी याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुरे ढोरे चोरल्याची मारवड येथील तीन गुन्हे आणि नरडाणा ता. धुळे पोलीस ठाण्यातील एक गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी संशयिताला मारवड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content