चाळीसगावात पाच मंगल कार्यालयाच्या मालकांवर गुन्हा

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरात काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधिक्षकांसह नायब तहसीलदारने शहरातील पाच मंगल कार्यालयावर धडक कारवाई आज सायंकाळी केली असून मंगलकार्यालयच्या मालकांवर बावीस हजारांचा दंड व गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लग्न समारंभात किंवा कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांनी गर्दी करू नये असे निर्देशन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र तरीही चाळीसगाव शहरातील पाच मंगल कार्यालयात आज लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याची माहिती  कळताच महसूल, नगरपालिका व पोलिस प्रशासन यांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली. यात मंगल कार्यालयाच्या मालकांवर बावीस हजारांचा दंड व शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले आदींनी कारवाई केली. तसेच हि कारवाई अशीच चालू राहणार असल्याचे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी सांगितले. 

 

Protected Content