आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील भोकर या गावी आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंती निमित्त साप्ताहिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित साप्ताहिक सामाजिक कार्यक्रमात पहिल्या दिवशी प्रा.भाऊसाहेब सोनवणे युवा ग्रुप भोकर तर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण ५२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. ज्यांनी शिबिरामध्ये रक्तदान केले अशा तरुणांना ५० हजार रुपयेचा अपघाती विमा संरक्षण मोफत देण्यात आले. त्याच प्रमाणे संध्याकाळी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान देण्यात आले.याप्रसंगी बृहदत सूर्यवंशी,  सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता, अध्यक्षस्थानी सुरजमल लाठी,सेवानिवृत्त एलसीबी पोलीस उपनिरीक्षक श्री. पवार ,उमेश सोनवणे उपस्थित होते. याश्वितेसाठी भोकर गावातील ग्रामस्थांनी तसेच युवा ग्रुपच्या सदस्यांनी  कामाक्ज पाहिलं.

Protected Content