वडिलांनी कमावले ते मुलांनी घालवले ! : नाथाभाऊंची खोचक टीका

डोंबिवली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेची धनुष्यबाण ही निशाणी तात्पुरती गोठवल्याच्या निर्णयावर आमदार एकनाथराव खडसे यांनी खोचक भाष्य केले आहे.

 

डोंबिवलीत आज डोंबिवलीतील आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे उपस्थित राहिले. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात नाथाभाऊ म्हणाले की, शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर मेहनत घेऊन धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांची वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणामध्ये गोठवली गेली. मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा. वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमावले ते एका मिनिटामध्ये मुलांनी घालवले. तात्पुरते का होईना निवडणूक चिन्ह गोठवले हे अत्यंत दु:खदायक, क्लेशदायक आहे.

एखनाथराव खडसे  पुढे म्हणाले की, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली आणि धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.  मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा. वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमावले ते एका मिनिटामध्ये मुलांनी घालवले. त्याला कोण जबाबदार आहे कोण नाही हे निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर समजेल परंतु निवडणूक चिन्ह तात्पुरते का होईना गोठवले ही अत्यंत दु:खदायक, क्लेशदायक गोष्ट आहे असे ते म्हणाले.

दरम्यान, खडसे यांनी रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट मिळाल्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, माझाही फोन ६८ दिवस टॅप करण्यात आला. कोणत्या कारणासाठी माझा फोन टॅप करण्यात आला याची मला अजूनही कल्पना देण्यात आलेली नाही.  रश्मी शुक्ला त्या कालखंडात प्रमुख होत्या म्हणून त्यांना जबाबदार धरण्यात आले होते. आता त्यांना क्लीन चिट दिली आहे, त्यामुळे या केसचे भवितव्य आता अंधारात असल्याचे नाथाभाऊ म्हणाले.

 

Protected Content