पाचोरा, भडगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जी.एम. फाऊंडेशन भाजपा कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रविवारी १० मार्च रोजी दुपारी ४ वाजता पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, विकासो चेअरमन यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला आहे.

पाचोरा शहरासह तालुक्यातील मोंढाळे, निंभोरी, वाडी, शेवाळे, शिंदाड, डोंगरगाव, बाळद, कोल्हे, लोहारी गावातील आणि भडगाव शहरासह तालुक्यातील वाक, वडजी, नालबंदी, बास्तर, गोंडगाव, सावदे, गुढे, तांदुलवाडी या गावातील काही तरूण, तसेच सरंपच, उपसरपंच, विकासोचे चेअरमन आणि इतर असे २०० जणांनी जी.एम. फाऊंडेशन भाजपा कार्यालयात रविवारी १० मार्च रोज दुपारी ४ वाजता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. आगामी निवडणूकांसाठी आता काही दिवसातच आंचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागावे असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, जिल्हा महानगराध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, लोकसभा प्रमुख राधेश्याम चौधरी यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

Protected Content