आरक्षणाचा अहवाल पाठवल्याने भुसावळात धोबी समाजातर्फे फटाक्यांची अतिषबाजी

dhobi samaj

भुसावळ, प्रतिनिधी | राज्यातील धोबी समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा देवून आरक्षणाचा लाभ मिळावा या मागणीचा अहवाल राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविल्याने महाराष्ट्र राज्य परिट धोबी समाज महासंघ सर्व भाषिक संघटनेने शहरातील शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयाजवळ फटाक्यांची आतिषबाजी करुन जल्लोष केला.

 

राज्यातील धोबी समाजाला १९६० पुर्वी राज्यात अनुसूचित जातीचा दर्जा होता. मात्र नंतर या समाजाला अनुसुचित जातीच्या यादीतून वगळण्यात आले होते. समितीचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्य धोबी परिट आरक्षण समन्वय समिती अध्यक्ष जी.डी. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली धोबी समाजाने सातत्याने आंदोलने करुन शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. तत्कालीन राज्य सरकारने डॉ. दशरथ भांडे यांच्या नेतृत्वात नेमलेल्या समितीने शासनाला अहवाल सादर करुन धोबी समाज अस्पृश्येतेचे सर्व निकष पुर्ण करतो असा सकारात्मक अहवाल दिला होता. यामुळे धोबी समाजाला पुर्वरत अनुसूचित जातीत समावेश होण्याचा मार्ग मोकळा होवूनही राज्य सरकारने चालढकल सुरु ठेवली. यामुळे धोबी समाज अत्यंत आक्रमक झाला होता. अखेर समाजाच्या लढयाला यश मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोबी समाजाचा अनुसूचित जातीचा दर्जा देवून आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी डॉ.दशरथ भांडे समितीचा अहवाल शिफारशींसह केंद्र सरकारकडे पाठविला आहे. हा निर्णय होताच महाराष्ट्र राज्य परिट धोबी समाज महासंघ सर्व भाषिक संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. त्यानंतर रेल्वे स्थानकाजवळील शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळयाजवळ संघटनेतर्फे फटाक्यांची आतीषबाजी करुन पेढे वाटून करण्यात येवून जल्लोष करण्यात आला.

यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य नाना ठाकरे, अ‍ॅड. निलेश मोघे, योगेश चंदन, भगवान चंदन, कन्हैया चंदन, चंदन परदेशी, मानसिंग परदेशी, जितेंद्र परदेशी, दिनानाथ चंदन, मंगल शेलोडे, अरुण शिरसाठ, सुभाष शिरसाळे, राजेंद्र शिरसाळे, छाया शेलोडे, मनिषा शिंदे, रंजना परदेशी, शकुतला परदेशी, नंदा परदेशी, कमला परदेशी, सुनंदा परदेशी, सुरेखा ठाकरे, प्रताप परदेशी, संजय परदेशी, राजेश चंदन, आनंदसिंग परदेशी, दिपक चांदेलकर, शंकर शेलोडे, शांताराम जाधव, अतुल कौसकर, प्रविण दहिभाते, भास्कर, जामोदकर,आनंदा सुरडकर, सुरेश परदेशी, चंद्रसिंग परदेशी, मधुकर परदेशी, गणेश परदेशी, भट्टू परदेशी, पुनम चंदन आदी उपस्थित होते.

Protected Content