Home Cities जामनेर शेरी येथे झाडावरून खाली पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

शेरी येथे झाडावरून खाली पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

0
112


पहुर, ता.जामनेर प्रतिनिधी | पहूर येथून जवळच असलेल्या ‘शेरी’ येथील एका शेतकऱ्याचा झाडावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

युवराज शंकर पांढरे (वय ५४) हे शेतकरी आज सोमवार, दि.३१ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतातील झाडावर चढून झाडाच्या फांद्याची छाटणी करत होते. असं करत असतांना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते झाडाच्या खाली पडले. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखांपत झाली. त्यांना उपचारासाठी तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. युवराज पांढरे यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे.


Protected Content

Play sound