बामणोद येथे खळयाला अचानक आग – दोन गुरांसह सहा लाखाचे शेती अवजार जळून खाक

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील बामणोद येथे खळयाला अचानक भीषण आग लागून सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे .

याबाबतचे वृत्त असे की, “सोमवार, दि.३१ जानेवारी रोजी ‘बामणोद’ गावातील शेतकरी पंकज हिरामण भंगाळे यांच्या खळ्याला अचानक आग लागून या आगीत सुमारे ६ लाख ६४ हजार रुपयाचे नुकसान झाले असून आगीत दोन गुरांचा देखील होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या आगीत पंकज भंगाळे यांचे शेती साहीत्य यात एक लाख ८० हजार रुपये किमतीचे क्रेसिंग पाईप, १२ हजार रुपये किमतीचे दोन इंची पाईप ३ इंची पाईप, १८ हजार रुपये किमतीचे तीन इंची पाईप, ४० हजार रुपये किमतीच्या किमतीच्या ठिबक नळ्या, ८५ हजार रूपये किमतीचे शेती अवजारे, ३५ हजार रुपयांचा गुरांचा चारा, २१ हजार रुपये किमतीचे सरपण, अडीच लाख रुपयाचे पत्र्याचे शेड ३ हजार रुपयाचे धान आणि २० हजार रुपये किमतीचे दोन जनावरे जळून खाक झाले आहेत.

यावेळी विविध ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग पाचारण करत आग आटोक्यात आणली. या घटनास्थळी बामणोद विभागाच्या मंडळ अधिकारी बबिता चौधरी, प्रभारी तलाठी भारत वानखेडे यांनी पंचनामा करून माहिती कळवताच पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसह सह फैजपूर पोलीस स्टेशनचे सहय्यक पोलीस निरिक्षक सिद्धेश्र्वर आखेगावकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. गावातील सर्व नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

याप्रसंगी प्रमोद बोरोले, गोकुळ लोखंडे, कल्पेश महाजन, भीमा झोपे, पवन महाजन, जीवन बोरोले, अरविंद झोपे, तंटा मुक्ती अध्यक्ष गोपाल भालेराव यांनी सहकार्य केले. आग नेमकी कशामुळे लागली ? याचे कारण समजू शकले नाही. फैजपूर, सावदा, भुसावळ नगरपरिषदेचे चार अग्निशमन बंब घटनास्थळी आग विझवण्यासाठी तात्काळ पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.

Protected Content