ब्रेकींग : भुसावळात गांज्याचा मोठा साठा जप्त; बाजारपेठ पोलिसांची कामगिरी

भुसावळ Bhusawal प्रतिनिधी | बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने सापळा रचून तब्बल ३३ किलो गांजा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. रावेर येथील ब्राऊन शुगर नंतर गांजाबाबत करण्यात आलेली कारवाई ही महत्वाची मानली जात आहे.

रावेर येथे काही दिवसांपूर्वीच एलसीबीच्या पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने केलेल्या कारवाईत तब्बल एक कोटी रूपयांचे ब्राऊन शुगर जप्त करून एका महिलेस अटक करण्यात आली होती. यानंतर काही तासांमध्येच या प्रकरणातील मुख सूत्रधार तथा मध्यप्रदेशातील मंदसौर येथील इसमाला अटक करण्यात आली असून ते सध्या कोठडीत आहेत.

या पार्श्‍वभूमिवर, काल रात्री बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक दिलीप भागवत यांना एका वाहनातून भुसावळच्या बसस्थानक परिसरात गांजा येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले. या पथकाने बसस्थानकाच्या परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास वाहन अडविले असता त्यात ३३ किलो वजनाइतका गांजा आढळून आला. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात बाजारपेठ पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content