बाहेरून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी RTPCR अनिवार्य : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई वृत्तसंस्था । ”प्रदेशातून किंवा परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंधामध्ये बदल करण्यात आले असून ओमिक्रॉनच्या बाबतीत काळजी घेत प्रवाशांना RTPCR चाचणी अनिवार्य असेल” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र आणि राज्य सरकार यांचे नियम एकसारखे नियम असावेत असं सांगतानाच शाळेसंदर्भात पुढे ते म्हणाले की, “शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली होती त्यामुळे तसा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यावेळी कोविड १९ चा ‘ओमिक्रोन’ नावाचा व्हायरस नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा लक्षात घेत महत्त्वाचा आहे. यावर शिक्षणमंत्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील त्यानंतर त्यावर योग्य तो निर्णय घेता येईल” असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं.

“मुख्य सचिव म्हणून देबाशिष चक्रवर्ती यांच्या नियुक्ती संदर्भात त्यानी, “मुदतवाढ होण्यासाठी केंद्र सरकारकडे तीन राज्यांचे प्रस्ताव गेले होते त्यापैकी मात्र सीताराम कुंटे यांना मुदतवाढ मिळाली नाही. त्यामुळे मुख्य सचिव म्हणून देबाशिष चक्रवर्ती यांची मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केली आहे.” असं सांगितलं.

 

Protected Content