गुरांची अवैधरीत्या वाहतूक : १३ जनावरांची सुटका

रावेर, प्रतिनिधी | कत्तलिच्या उद्दीष्टाने मोरव्हालकडून रावेरच्या दिशेने येणाऱ्या दोन महेंद्र पिकअप गाडयांना पाल पोलिसांनी पकडले आहे. यात सुमारे १३ गुरांची सुटका करण्यात आली असून त्यांना जळगाव येथील बाफना गौ-शाळेत रवाना केले आहे.

 

पाल पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन मोरव्हाल नजिक सापळा रचुन दोन महेंद्र पिकअप एमएच ०४ जिएफ १८६० व एमएच ०४ जिएफ ८७६७ या दोन्ही गाड्या पकडण्यात आले. या दोन्ही गाड्यांमधून सुमारे १३ गुरांची सुटका करण्यात आली आहे. या गुरांना कत्तलीच्या उद्दीष्टने कोंबुन नेले जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.ही कारवाई फौजदार राजेंद्र राठोर पो कॉ दिपक ठाकुर पो कॉ नरेंद्र बाविस्कर यांच्या पथकाने केली आहे.मध्य प्रदेशातुन मोठ्या प्रमाणात पाल मार्गे गुरांची तस्करी होत असते याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी पशुप्रेमी करत आहे.

Protected Content