Home क्राईम यावल तहसील कार्यालयातील संगणकाचा गैरवापर; एकावर गुन्हा दाखल

यावल तहसील कार्यालयातील संगणकाचा गैरवापर; एकावर गुन्हा दाखल


यावल प्रतिनिधी । यावल तहसील कार्यालयात शासकीय लॉगीनचा गैरवापर केल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल तहसील कार्यालयातील संगणकमध्ये १४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर रोजी संशयित आरोपी ललित नारायण वाघ रा. किनगाव ता. यावल याने शासकीय लॉगीन करून अनधिकृतपणे पी.ए. किसान योजनेत बेकायदेशीर ३८ शेतकऱ्यांचे रजिष्ट्रेशन केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी २२ ऑक्टोबर रोजी  दिपक शांताराम बाविस्कर (वय-३९) रा. यावल यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी ललित वाघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound