पारंपरीक लढतीत पुन्हा चिमणआबांची सरशी ! : सतीशअण्णांना चारली धुळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा-एरंडोल मतदारसंघातील पारंपरीक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ख्यात असणारे आ. चिमणराव पाटील आणि माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यातील एक लढत जिल्हा दुध संघात देखील रंगली.

आमदार चिमणराव पाटील आणि त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. सतीश पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. गेल्या सुमारे २५ वर्षांमध्ये आधीच्या पारोळा आणि नंतरच्या पारोळा-एरंडोल मतदारसंघात हे दोन्ही मान्यवर अनेकदा एकमेकांच्या समोर आले आहेत. विधानसभेच्या रिंगणात दोन्ही नेते आलटून-पालटून निवडून येण्याचा प्रघात आजवर कायम झाल्याचे दिसून आले आहे. सहकारात मात्र आ. चिमणराव पाटील यांची एकहाती पकड असल्याचेही अधोरेखीत झाले आहे. सद्यस्थितीत आमदार पाटील आणि त्यांचे पुत्र अमोल हे जिल्हा बँकेत संचालक आहेत. ते स्वत: आधी जिल्हा दुध संघात होते. यंदा त्यांनी पारोळा सोसायटी मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनलतर्फे अर्ज भरला. त्यांना डॉ. सतीश पाटील यांनी सहकार पॅनलमधून आव्हान दिले. ही लढत चुरशीची झाली.

दरम्यान, आज सकाळी झालेल्या मतमोजणीत आमदार चिमणराव पाटील यांना २२७ तर डॉ. सतीश पाटील यांनी २०८ इतकी मते मिळाली. यामुळे चिमणआबा १९ इतक्या मताधिक्याने विजयी झाले. अर्थात, पारंपरीक लढतीत आबांनी अण्णांना धुळ चारल्याचे दिसू आले.

Protected Content